आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शहरातील १० कोटी ४५ लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील विविध वार्डातील पूल बांधकाम, रस्ते बांधकाम, स्थानिक स्मशानभूमी येथे विविध प्रकारची कामे तसेच तालुक्यातील 27 तलाठी कार्यालय चा भूमिपूजन सोहळा 8 सप्टेंबरला माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडला.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध प्रलंबित कामासाठी आमदार शिंगणे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवण्यासाठी, सात कोटी सत्तर लक्ष रुपयाचा निधी तसेच नियोजन विकास निधी दोन कोटी, अल्पसंख्यांक निधी 65 लक्ष रुपये, स्थानिक आमदार निधी 10 लाख रुपये असा एकूण दहा कोटी 45 लक्ष लक्ष रुपये कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यामध्ये सावता माळी मंदिराजवळील नाल्यावर मुलाचे बांधकाम व नाला बांधकाम करणे, माळीपुरा भागातील रस्ते बांधकाम, महाद्वार चौकापासून संत सावतामाळी मंदिरापर्यंत नाली बांधकाम, तालुक्यातील एकूण 27 तलाठी कार्यालय भूमिपूजन, शहरातील दत्तनगर भागातील नाली सहरस्ते बांधकाम, बायपास जवळील खडीकरण व काँक्रीट रस्ता तयार करणे , स्मशानभूमीतील वॉल कंपाऊंड बैठक व्यवस्था शेड बांधकाम दहन शेड बांधकाम इतर कामे, तसेच अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत एकूण पाच कामांचे भूमिपूजन आमदार शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड नाझेर काझी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, डॉक्टर रामप्रसाद शेळके प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, तुकाराम खांडेभराड,माजी नगराध्यक्ष दे राजा, विठ्ठलराव मगर माजी अध्यक्ष खरेदी विक्री संस्था, संतोष खांडेभराड माजी नगराध्यक्ष, गंगाधर जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, हाजी आलम खा कोटकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अरुण मोकळ मुख्याधिकारी तथा प्रशासक न पा दे राजा, विष्णू दाजी रामाने माजी नगराध्यक्ष, कवीश जिंतूरकर माजी नगराध्यक्ष, श्रीमती सरस्वती बाई टेकाळे माजी नगराध्यक्ष, गणेश सवडे माजी नगरसेवक देऊळगाव राजा, राजू शिरसाट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अर्पित मीना से शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अरविंद खांडेभराड, अमोल जाधव, यांच्यासह सबंधित वार्डातील रहिवासी नागरिक तथा असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.