अभ्युदय मेघे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असताना काँग्रेस नेते तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे यांच्या ठाकरे मार्केट स्थित जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती डॉ.मेघे यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष चांदूरकर यांनी त्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले या कार्यालयाच्या माध्यमातून नागरीकांना त्याच्या समस्या सोडविल्यासाठी मदत होईल.मेघे यांचे कार्य फार मोठे आहे.त्यांनी भविष्यात अजून मोठे काम करण्यासाठी नागरिकांनी त्यांना बळ द्यावी ही विनंती त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी माजी नगरअध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांच्या अध्क्षतेखालील कार्यक्रम पार पडला. सौ.मनीषा मेघे,अविनाश सातव, श्रीकांत बारहाते, प्रफुल गुल्हाने,परवेझ शेख, दिलीप कठाणे, श्याम परसोडकर, सुधाकरराव मेहरे, आलोक पोद्दार, किनकर, संजय भगत, पुरुषोत्तम खासबागे, सुनील मुरतकर, राकेश पटेल, ऋतुराज चुडीवाले, दिनेश रुद्रकार, कन्हैया छांगानी, विनय डहाके, रवींद्र कडू, मनीष तेलरांधे,मोहित सहारे तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.