Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

खा. प्रतिभा धानोरकरांचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

खासदारांच्या प्रतिमेला भाजपा महिला आघाडीचे प्रतीकात्मक जोडे मारो आंदोलन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर:आमदार म्हणून शून्य कामगिरी असलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असलेले. आता पुन्हा खासदार धानोरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना मस्ती उतरविण्याची भाषा केली आहे. खासदारांच्या या वक्तव्याचा निषेध करीत भाजप महिला आघाडीने खासदार धानोरकर यांच्या फोटोला चप्पल मारत आंदोलन केले. विशेष म्हणजे खासदारांच्या या वादग्रस्त वक्तव्यचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांची आमदार म्हणून मागील पाच वर्षातील विकासाची पाटी कोरी आहे. त्यांच्या नावावर सांगण्यासारखे एकही विकास काम नाही. त्यामुळे विकास पुरुष अशी जनमानसात ओळख असलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करतात. वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन येथे सुरू आहे. या आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या मंडपाला भेट दिल्यानंतर त्यांनी भाषण करताना पालकमंत्री मुनगंटीवार यांची मस्ती उतरविण्याची असभ्य भाषा केली. खासदार धानोरकर म्हणाल्या, पालकमंत्री, ज्यांना तुम्ही विकासपुरुष म्हणता, त्यांनी या जिल्ह्यात ज्या पद्धतीने गंमत दाखवली आहे ते तुम्ही पाहिले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. गेल्या लोकसभेत त्यांची अर्धी मस्ती आम्ही काढून घेतली. उरलेली मस्ती आगामी विधानसभेत उतरवू. एवढी मस्ती उतरविल्यानंतरही त्यांचा माज कमी झालेला नाही हे तुम्ही पाहिले आहे. सत्तेची नशा आजही त्याच्या अंगात आहे. पण हा माज व मस्ती उतरविणे आपल्या हातात आहे, या राज्यात काँग्रेस महाआघाडीचे सरकार येणार आहे. भाजपच्या लोकांकडून राज्यात आणि देशात जो हुकूमशाहीचा प्रकार सुरू आहे, तो कोणत्याही परिस्थितीत थांबवावा लागेल.

दरम्यान खासदार धानोरकर यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याबद्दल वापरलेल्या असभ्य भाषेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. तसेच भाजप महिला आघाडीच्या वतीने खासदार धानोरकर यांच्या वक्याव्याचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारून आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला. या निषेध आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार धानोरकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये