ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

गोंदेडा येथे भाजपची टिफिन पार्टी कार्यक्रम संपन्न.

भाजप बूथ रचना मजबूत करून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे - आमदार बंटीभाऊ भांगडिया

चांदा ब्लास्ट

देशात भाजप च्या वतीने महाजनसंपर्क अभियान राबविल्या जात असून त्यातील टिफिन पार्टी हा कार्यक्रम असून या माध्यमातून आपल्या बूथ क्षेत्रात बूथ रचनेची अवस्था कशी आहे? ती बूथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे आणि पक्षाच्या आलेल्या डिजिटल माहिती ची पूर्ण माहिती द्यावी. सन २०१४ पूर्वी चा आणि २०१४ चा भारत देश आणि आपला चिमूर विधानसभा क्षेत्र कसा विकास होत आहे. हे ठासून सांगावे आणि जनते पर्यत योजनांची माहिती द्यावी येणाऱ्या काळात जीप क्षेत्र वाईज टिफिन पार्टी आयोजित करण्यात येईल असे सांगत भाजप ची बूथ रचना मजबुत करून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले.

गोंदेडा येथील टिफिन पार्टी कार्यक्रम प्रसंगी भाजप जेष्ठ नेते वसंत वारजुकर , भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे , कृउबास सभापती मंगेश धाडसे , चिमूर सहकारी तांदूळ गिरणी संचालक ओमप्रकाश गणोरकर व योगेश नाकाडे सौ मायाताई ननावरे, माजी सभापती सतीश जाधव तसेच कृउबास संचालक प्रशांत चिडे,राजू बानकर,संदीप पिसे दिनकरराव शिनगारे, भाजप अध्यक्ष सचिन फरकाडे,शहर ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे कमलाकर लोणकर, समीर राचलवार ,संजय नवघडे, सभाजयुमो तालुका अध्यक्ष बाळू पिसे शहर अध्यक्ष बंटी वनकर शहर महामंत्री श्रेयस लाखे अमित जुमडे, रमेश कंचर्लावार, विकी कोरेकर, किशोर मुंगले,रवी लोहकरे, संजय कुंभारे, हरिश पिसे,सचिन डाहूले, आदित्य कारेकर ,नितेश दोडके, राजू बोडणे दिलीप पाटील नलोडे, महादेव कोकोडे, शैलेंद्र पाटील अर्जुन पाटील थुटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन जयंत गौरकर यांनी केले.तालुक्यातील भाजप भाजयुमो महिला पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये