रामनवमी निमित्त चंद्रपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन – कमान उभारून मुस्लिम समाज करणार शोभायात्रेचे स्वागत
परंपरेप्रमाणे पाच मागास जातीचे प्रतिनिधी करणार पूजन - राम भक्तांच्या सुविधेसाठी विशेष उपाययोजना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूर येथे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन शोभायात्रा उत्सव समिती तर्फे करण्यात आले असुन यंदाची शोभायात्रा अभूतपूर्व असेल असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.
6 एप्रिल रोजी असणाऱ्या रामनवमी Ram Navami निमित्त चंद्रपूर शहरात आयोजित शोभायात्रेचे स्वागत विविध लोकांकडून तसेच समाजाच्या संघटनांकडून करण्यात येत असते. यंदा शोभायात्रेच्या मार्गात 100 स्वागत कमानी welcome gate उभारण्यात येणार असुन ह्यावेळचे आकर्षण म्हणजे यंदा बोहरा समाजव्यतिरिक्त सुन्नी मुस्लिम समाज muslim community देखिल स्वागत कमान उभारून श्रीराम शोभायात्रेचे स्वागत करणार असुन मुस्लिम समाज स्टॉल लाऊन भक्तांची सेवा देखिल करणार असल्याचे मुस्लिम समाजाने शोभायात्रा समितीला कळवले आहे.
देशात विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम संघर्ष सुरू असतात, राजकीय तसेच सामाजिक घटनांमुळे दोन्ही समुदायात संघर्ष निर्माण होतो मात्र नुकताच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणा कायदा मंजूर केला असल्याने मुस्लिम समाजात काही ठिकाणी रोष आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन रामनवमी शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रयत्नरत होती मात्र शोभायात्रा समितीने मुस्लिम समाजाच्या जाणत्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याने मुस्लिम समाजाने शोभायात्रेचे स्वागत करण्याचा निर्णय घेऊन उत्तम आदर्श घालून देतानाच हिंदू मुस्लिम ऐक्याचा परिपाठ घालून देण्याचा प्रयत्न केला आहे हे विशेष.
चंद्रपूर येथे रामनवमी निमित्य निघणाऱ्या शोभायात्रेदरम्यान समाजातील मागास जाती प्रवर्गाच्या प्रतिनिधींना पूजनाचा मान देण्याची परंपरा असुन त्यानुसार यंदाही पाच मागास जाती प्रवर्गाच्या प्रतिनिधींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेचे सुरुवात करण्यात येणार आहे.
6 एप्रिल निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत रामायणातील विविध घटनांवर चित्ररथ तयार करणार असून विशेष आकर्षण म्हणून राम वन पथगमन मार्ग सुद्धा साकारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. शोभायात्रेदरम्यान आयोजन समितीने लेझीम तसेच बँड पथक सामील केले असुन डिजे DJ चा वापर समिती करणार नाही मात्र कुणीही शोभायात्रेत डिजे वाजवणार असल्यास त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच रात्री ठीक दहा वाजता कायद्यानुसार डिजे बंद करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रामभक्तांना कुठलाही त्रास होऊ नये ह्यासाठी आयोजन समितीने पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नियोजन केले असुन शोभायात्रा पोहचण्यापूर्वी तसेच निघुन गेल्यानंतर शक्यतो ते मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याची योजना आखली असल्याने नागरिकांना होणारा संभाव्य व्यत्यय नियंत्रणात आणता येणार आहे.
ही शोभायात्रा श्री काळाराम मंदिर येथून निघणार असुन जोड देऊळ, गांधी चौक, लक्ष्मी नारायण मंदिर, जटपुरा गेट, स्वामी नारायण मंदिर, गिरनार चौक मार्गे परत श्री काळाराम मंदिर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर महाआरती करून भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल अशी माहिती जनता महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश बागला, योगेश भंडारी, अजय वैरागडे आदींनी दिली ह्यावेळी श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, उपाध्यक्ष विनोद उपाध्याय, सचिव विजय येंगलवार, कोषाध्यक्ष सुधीर टिकेकर, सदस्य विश्वास माधमशेट्टीवार, सदस्य, नितीन गाटकीने, ब्रीजगोपाल, तथा श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष डॉ. गोपाळ मुंधडा, उपाध्यक्ष अजय वैरागडे, उपाध्यक्ष अरुण तीखे, सचिव दीपक बेले, सहसचिव सचिन गाटकीने, श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा सल्लागार समितीचे हरिश्चंद्र अहिर, मधुसूदन रुंगठा, रामकिशोर सारडा, ज्ञान टहलियानी, संदीप पोशटीवर, मनीष सूचक, सुरेश शर्मा, मिलिंद कोतपल्लीवार, चमकोर सिंह, रामजीवन परमार, शैलेंद्र शुक्ला, सुनील महाकाले उपस्थित होते.
#chandablast