Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने लिंगा रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     सांगडी दुर्भा (तेलंगण स्टेट) येथे मार्च २०१२ मध्ये संपन्न झालेल्या १० व्या आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ गुरुदेव सेवक लिंगा रेड्डी गड्डमवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सांगडी दुर्भा (मंडल- बेला) येथे दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. गावालगतच्या उत्तर वाहिनी पैनगंगेच्या तिरी त्यांचेवर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

     राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने दिवंगत लिंगा रेड्डी गड्डमवार यांना आँनलाईन पध्दतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे सरचिटणीस ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी करून लिंगा रेड्डी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य ईंजी.विलास उगे (कोराडी), संदीप कटकुरवार (ब्रम्हपुरी), भाऊराव बोबडे (मुंबई), श्रीकांत धोटे (टाकळी), सांगडी (दुर्भा) येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे श्री.भूमारेड्डी यल्टीवार, प्रभाकर नवघरे, शिवाजी भेदोडकर,अनिल भेदोडकर, सुनिल भोयर,मधुकर भेदोडकर,संजय तिळसम्रुतकर, जानकराव नवघरे, दिलीप लसने, नानाजी मालेकर, दयाकर नल्लावार,प्रकाश सोनटक्के, बाबुमिया शेख, लटारू मत्ते,मनोहर बोबडे , एड. सारिका जेनेकर , विनायक साळवे, संजय वैद्य आदींनी लिंगा रेड्डी यांच्या सेवाकार्याचे स्मरण करून आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्र राज्य लगतच्या तेलंगण प्रांतातील ग्रामीण जनतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला मानवतेचा विचार रूजवण्यासाठी लिंगा रेड्डी यांनी विशेष प्रयत्न केले. याकरिता त्यांनी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतले होते. एकंदरीत सच्चा राष्ट्रसंत प्रेमी म्हणून त्यांचे सदैव स्मरण होत राहील, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रावण बानासुरे (बल्लारपूर) यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये