Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्राईट किड्स अकॅडमीत रक्षाबंधन निमित्ताने वृक्षांना राखी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  चंद्रपूर शहराजवळील देवाडा येथील महाकाली नगरीतील ब्राईट किड्स अकॅडमी मध्ये भारतीय सण रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने घरच्या वस्तूपासून राखी तयार करणे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अकॅडमी च्या संचालिका श्रीमती रजनी बोढेकर यांनी यावेळी रक्षाबंधन आणि आपली संस्कृती यासंबंधी माहिती देत अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना राखी निर्मिती चे प्रशिक्षण दिले. त्यानंतर परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रूजविला. या उपक्रमात कु. मुग्धा बावणे, कु. पूर्वश्री धोंगडे,आर्यश निमकर, स्वराज काळे, कु. अद्विका जीवतोडे, अंश धांडे, गौरव उपरे, तयाग सुखदेव, कु.रिध्दी बावने, अर्थव बोबडे आदी बाल विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहयोग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये