Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नक्षत्रांच देणं काव्यमंचचा काव्यातील नक्षत्र आविष्कार कार्यक्रम संपन्न

चंद्रपूरच्या कवयित्री रोहिणी मंगरूळकर यांनी गाजवली मैफिल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालयाच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे ” नक्षत्र… काव्यवाचन आविष्कार”या थिएटर शोचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे करण्यात आले होते.

   कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी कवी म. भा. चव्हाण, प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, समाजसेविका डॉ .अलका नाईक, मिलिंद घोगरे, वसंतराव कुलकर्णी, नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे इ. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     याप्रसंगी गोयल म्हणाले,” महाराष्ट्रातील वाढत गेलेली ही काव्य चळवळ कवींना प्रेरणा देणारी आहे. सामाजिक भान ठेवून हे संस्था कार्य करत आहे. संस्थेच्या अध्यक्षांच्या धडपडीमुळे हा मंच कवींच्या आशेचा किरण बनला आहे.’ अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात.”

     कवी चव्हाण म्हणाले की, अनेक कवीना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

     या थिएटर शो मध्ये पाऊस व प्रेम या विषयावरच्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या काव्य मैफलीत चंद्रपूर नक्षत्रांच देणं काव्यमंच च्या जिल्हा प्रमुख कवयित्री श्रीमती रोहिणी मंगरूळकर, कवी चव्हाण -पुणे, डॉ.अलका नाईक मुंबई, यशवंत घोडे-जुन्नर , सौ वृषाली टाकळे-रत्नागिरी, शहानूर तडवी -जळगाव, मनोज कुमार सरदार-बुलढाणा , पियुष काळे-आळेफाटा ,सौ सुलभा चव्हाण- मालाड , डॉ. लक्ष्मण हेंबाडे सोलापूर,रामदास अवचर-नगर, सतिश कांबळे-सांगवी,सुनील बिराजदार-सोलापूर, भाऊ आढाव-चिंचवड, अनिल जाधव-दुबई,प्रा. पोतदार-गोंदिया, अशोक वाघमारे- देहू रोड, अक्षय पवार -श्रीगोंदा, नवनाथ पोकळे-बीड, मंगेश रेडीज-मुंबई, कविवर्य एम. ए .रहीम -चंद्रपूर, कविवर्या सौ ज्योती भोर ,सुरेशचंद्र चनाल-निगडी, पांडुरंग घोलप- कर्जत, डॉ.शीलवंत मेश्राम, सौ. अर्चना धानोरकर,बबन चव्हाण इत्यादींनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन प्रा. राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष-नक्षत्राचं देणं काव्यमंच,कवी वादळकार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये