Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रूपापेठ येथे तालुका विधी सेवा समिती कोरपणा शिबीर संपन्न

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण,उच्चं न्यायालंय मुंबई याचे निर्देशान्वे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चंद्रपूर व तालुका विधी सेवा समिती कोरपणा याचे संयुक्त विद्यमाने किमान समान कार्यक्रमा अंतर्गत कायदेविषयक शिबिराचे दि. 21 ला रूपापेठ येथे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.आर.आर.थोरात साहेब अध्यक्ष ता.वी.से.समिती तथा दिवानी न्यायाधिश ‘क’ स्तर तथा न्या.प्र.श्रेणी कोरपणा तसेच प्रमुख वक्ते मा.प्रकाश व्हटकर तहसीलदार कोरपणा मा. विजय पेंदाम गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा मा.गोविंद ठाकूर तालुका कृषी अधिकारी कोरपणा मा सचिन मालवी गटशिक्षणाधिकारी प.स.कोरपणा,मा.बावणकर मुख्याध्यपक,मा.शंकर तलांडे केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक जि. प.उच्चं मा.शाळा दुर्गाडी याच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले.

शिबिरात प्रमुख वक्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील योजना विषयी मार्गदर्शन करून शासकीय योजनाचा लाभ घेण्याचे आव्हान केले .या शिबिरात संजय गांधी निराधार,अन्नपुरावठा , निवडणूक,जमीन विषयी भोगवटदार 1 , आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासनी ,कृषी विभागा आदी योजनाचे टेबल शिबीर स्थळी लागून गरजु लाभार्थ्याना सेवा उपलब्ध होत्या.शिबीरासाठी श्री.धकाते साहेब,श्री गेडाम मंडळ अधिकारी, विरेंद्र मडावी तलाठी,श्री.मारस्कोल्हे ग्रामसेवक,श्री जाधव कृषिसेवक, सलीम शेख,परचाके,सुरेश,नागोशे,रवी पंढरे, तसेच मा.सरपंच विलास आडे, मनोज तुमराम,यांनी मोलाचे सहकार्य केले.अड.पवन मोहितकार यांनी संचालन केले तर कार्यक्रमाचे आभार अड महेश धामोरीकर यांनी मानले या शिबिराला मोठया संख्येने परिसरातील नागरिक ,विद्यार्थी यांनी लाभ घेतला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये