Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बदलापूर येथील महिला पत्रकार मोहीनी जाधव यांना अपमानित व औराच्य भाषेत बोलणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

तालुका पत्रकार संघ व म.राज्य मराठी पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

      बदलापूर येथे एका नामांकित शाळेत शिकणा-या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेने महाराष्ट्र हादरलेला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून संतापजनक आहे. बदलापूर येथे आंदोलन सुरु असतांना महिला पत्रकार मोहीनी जाधव हया बातमी संकलनासाठी गेल्या असता माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मोहिणी जाधव यांना अपमानास्पद बोलत तुमच्यावर रेप झाला का? तर तुम्ही बातमी करायला आला आहात, पत्रकार लोकांना भडकविण्याचे काम करतात. पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे बोलून स्वतंत्र पत्रकारीता गडचेपी करीत धमकी देवून आवाज दाबण्या प्रयत्न केला.

सदर प्रकरणात पिढीत महिला पत्रकाराने सदर बाबीची तक्रार पोलीस स्टेशनाला दिली असता पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही.सदर प्रकार पत्रकाराची गडचेपी व स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे यामुळे इतर पत्रकरांच्या भावना दुखावल्या आहेत. वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावा. अशी मागणी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, जिल्हाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले.

       यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके,सचिव गोवर्धन दोनाडकर, जेष्ठ पत्रकार प्रा. विजय मुळे, दिपक पत्रे, शिवराज मालवी,महेश पिलारे, म.राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव नंदुभाऊ गुडेवार, राहुल मैंद, रूपेश देशमुख, अमर गाडगे व अन्य पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये