Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट येथे अवैध दारु विक्रेत्याकडून दहा लाखाचेवर मुद्देमाल जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, स्वीपर कॉलनी,हिंगणघाट येथे एक इसम एका टीव्हीएस Jupiter मोपेड वाहनावर देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने स्वीपर कॉलनी हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे टीव्हीएस कंपनीची सिल्वर ग्रे रंगाची Jupiter मोपेड वाहन येतांना दिसल्याने त्यास पोस्टाफचे मदतीने नाकाबंदी करून वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.

त्याने त्याचे नाव गाव रवींद्र शंकर मेकलवार वय 24 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड,हिगणघाट असे सांगितले. पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदानवर ठेवून असलेल्या चुगडी मध्ये देशी दारूने भरून असलेल्या प्रीमियम न.1 कंपनीचा 90 ml चा 200 सीलबंद शिश्या प्रती 100 रु. प्रमाणे 20,000 रु. जुनी वापरती टीव्हीएस कंपनीची सिल्वर ग्रे रंगाची Jupiter मोपेड वाहन क्र.mh 32 aw 1401 किंमत 90,000 रु. असा एकून 1,10,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. व मनोज गभने, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. उपनी सतीश जायभाये यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पो.शी. अमोल तिजारे ,पो.शी संदीप उईके,पो.शी रोशन चाचेर यांनी केली. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये