नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी लैंगिक शिक्षण कार्यशाळेचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- आज दिनांक 6/8/ 2024 ला सकाळी 7.30 वाजता नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय रेड रिबन क्लब,गर्ल्स वेल्फेअर कमिटी, अंतर्गत तक्रार निवारण समिती
व उपजीला रुग्णालय ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त्त विद्यमाने व डॉ. डोकरीमारे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात मुलींसाठी लैंगिक शिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गहाणे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून महाविद्यालयात लैंगिक शिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे हे समजून दिले प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित प्राजक्ता फुललेलेे (आयसीटीसी समुपदेशक उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी )यांनी मुलींना वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल ,लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता नसल्यामुळे घेण्यात येणारे चुकीचे निर्णय व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला डॉ. एस .एम शेकोकर, उपप्राचार्य व चेअरमन,अंतर्गत तक्रार निवारण समिती. डॉ.प्रकाश वटी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन डॉ. कुलजित कौर गिल, चेअरमन रेड रिबीन क्लब, यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी गर्ल्स वेल्फेअर कमिटी, अंतर्गत तक्रार निवारण समिती च्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.