Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस-पडोली-ताडाली व चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी – ब्रिजभूषण पाझारे 

पडोली ठाणेदार यांना दिला शिकायत, खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा आंदोलन - ब्रिजभूषण पाझारे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रणयकुमार बंडी

चंद्रपूर : घुग्घुस-पडोली-ताडाली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या मागणीसाठी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी पडोली ठाणेदार यांना रिपोर्ट दिला आहे आणि खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.

 ब्रिजभूषण पाझारे यांनी स्पष्ट केले की, “रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करावी आणि खड्डे बुजवावेत. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.”

 यासोबतच, पाझारे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “मी स्वतः या रस्त्याची पाहणी केली असून पडोली ठाणेदारांना रिपोर्ट सादर केला आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार आहोत.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये