ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी रंजना पारशिवे, कार्याध्यक्ष पदी अर्चना बुटले यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी रंजना पारशिवे तर कार्याध्यक्ष पदी अर्चना बुटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केली आहे. चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. धनंजय मुंडे यांनी पारशिवे व बुटले यांचे अभिनंदन करुन आगामी कार्यास शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहून पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य जनते पर्यंत पोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

         महिला पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देताना जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राजीव कक्कड, चारुशीला बारसागडे, विलास नेरकर, उल्हास करपे, आबीद अली, सुनिल काळे, संतोष देरकर, महेंद्रसिंग चंदेल, रमेश कराळे, मंगेश पोटवार, रवींद्र भोयर, सुरेश हेमके,जहिर खान, सुजीत उपरे, अभिनव देशपांडे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये