Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त शामादादा कोलाम ब्रिगेड चे शिंदे सरकार कडे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

केळापूर – शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संघटनेच्या निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असताना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केळापूर तहसील कार्यालय मार्फत निवेदन सादर करून. शामादादा कोलाम यांच्या नावाने आदिवासी कोलाम समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार घोषित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे

सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की शामादादा कोलाम यांनी स्वतंत्रपूर्व काळात अन्यायाच्या विरोधात लढा दिला असुन तत्कालीन कार्यकाळात अनुसूचित जाती पैकी कोलाम जातीतील लढाऊ नेतृत्व म्हणून समाज हिताचे कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने आदिवासीं कोलाम समाज भूषण पुरस्कार घोषित करून द्यावा अशी मागणी सहित आदिवासीं समजाच्या कब्जात असलेल्या जमिनी संवरक्षणा करिता शामादादा कोलाम आदिवासीं भुमिहक्क आयोग स्थापन करण्यात यावे अश्या विविध मागण्या शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असुन शामादादा कोलाम यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाज हिताचे कार्य करणे हीच खरी आदरांजली अर्पण होईल असे मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दिरा बोंदरे प्रदेश अध्यक्षा शामा दादा कोलाम ब्रिगेड सामाजिक संघटना 7796191596

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये