Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या जन्मदिनी फ्लेक्स बॅनर न लावण्याचे आवाहन – 30 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सेवा पंधरवडा

सेवा, सहयोग आणि सहकार्य ह्या त्रिसूत्री वर कार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन - 30 जुलै हा सेवादिन म्हणून साजरा करा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर : राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ३० जुलै रोजी वाढदिवस असून कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस आरोग्य शिबीरे आणि विविध जनसेवेच्या माध्यमातून साजरा करावा, तसेच ३० जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. हरिष शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे प्रमुख श्री देवराव भोंगळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की,

राज्यात सर्वदूर आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती लक्षात घेता, गरजवंतांना आरोग्यसेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा यंदाचा वाढदिवस साजरा करण्यात यावा आणि त्या माध्यमातून त्यांच्या दिर्घार्युरोग्यासाठी तसेच त्यांना जनसेवेसाठी ऊर्जा मिळावी यासाठी प्रार्थना करूया असे आवाहन करण्यात आले आहे.

या सोबतच ३० जुलै ते १५ ऑगस्ट हा पंधरवडा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे आवाहन सुद्धा भाजप नेत्यांनी केले आहे.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फ्लेक्स बॅनर लावू नये असे आवाहन करत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर अशा सेवाभावी कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

बल्लारपूर मतदार संघातील मूल व पोंभुर्णा तालुक्यातील पूर परिस्थितीचा नुकताच ना. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला आणि अतिशय संवेदनशीलपणे पूरग्रस्तांना मदतीसाठी यंत्रणा कामाला लावली. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे असाच मनोदय कायम ना. सुधीर मुनगंटीवार यांचा राहिला आहे. त्यांच्या वाढदिवशी कुठलेही मोठे सेलिब्रेशन होऊ नये अशी त्यांची मनोमन इच्छा असून सेवा, सहयोग आणि सहकार्य या त्रिसूत्री वरच कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन देखील भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.

असे आहे कार्यक्रमांचे आयोजन !

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी सकाळी ८.०० वाजता गिरनार चौक चंद्रपूर येथे रक्तदान शिबीर, सकाळी ९.०० वाजता कोंडी येथे महाआरती, सकाळी ११ वाजता पोंभुर्णा येथे महाआरोग्य शिबिर, १२:४५ वाजता राजुरा येथे महाआरोग्य शिबिर, दुपारी ३.३० वाजता घुग्घूस येथे महाआरोग्य शिबिर, सायं. ५. ०० वाजता वाजता मुल येथे महाआरती तर सायंकाळी ७:०० वाजता बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात महाआरती, गोंडपिपरी येथे विविध शासकीय योजनांच्या मदतीकरिता निशुल्क सेवा दिन ईत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजप नेत्यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये