ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला,या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 समुदाय सहभाग दिवस निमित्य समापन कार्यक्रमाचे आयोजन २८जुलै ला करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार , शाळेची माजी विद्यार्थी तथा डॉ. सोनटक्के ,पॅथॉलॉजिस्ट डॉ.दासर, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे ,पर्यवेक्षिका सौ विना देशमुख होत्या.

याप्रसंगी डॉ. सोनटक्के, डॉक्टर दासर,माजी उपप्राचार्य आकनुरवार,कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य माहुरे तसेच सहाय्यक शिक्षक प्रशांत धाबेकर व प्रा. आशिष देरकर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, जीवन कौशल्य तसेच व्यावसायिक विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये