रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टचा पदग्रहण सोहळा संपन्न
नविन सदस्यांना रोटरी पिन देऊन सदस्य केले
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर
रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टचा पदग्रहण सोहळा दि. २१ जुलै २०२४ रोजी स्थानिक हॉटेल विला येथे संपन्न झाला. असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत रेशीमवाले यांच्या अध्यक्षतेखाली पुर्व अध्यक्ष रो. मदन अहिरकर यांनी रोटरीक्लबचा कार्यभार नविन अध्यक्ष डॉ. रोहन आईंचवार यांच्या हाती सोपविला. तसेच रो. मदन अहिरकर यांनी गतवर्षीचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांचा सत्कार केला.
कार्यकमाचे अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले यांनी रोटरी गव्हर्नर राजोंदर खुराना यांचा मॅसेज वाचला व रोटरीचे कार्याबद्दल माहिती दिली. नविन अध्यक्ष डॉ. रोहन आईंचवार यावर्षाचे रोटरी गोल सांगीतले तसेच त्यांनी नविन कार्यकारीनी स्थापीत केली. या वर्षीच्या नविन सदस्यांना सचिन जैन, विवके जैन, इस्माइल जव्हेरी, ताहेर अली यांना अध्यक्षांनी रोटरी पीन देऊन सदस्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. योगेश सालफळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव मोरेश्वर झोडे यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टने सर्व सदस्य उपस्थित होते.