Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जन्मदाता पित्यास रागाच्या भरात हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा

तसेच, १०,०००/-रु. दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथील मा. श्री.व्ही.पी.आदोने सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश,-०४ वर्धा यांनी आरोपी नामे प्रदीप उर्फ डाई प्रल्हादराव घांगळे वय ४७ वर्ष रा. गुंजखेडा ता. देवळी, जि. वर्धा यास १) कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व १०,०००/-रु. बंड, व दंड न भरल्यास ०१ वर्षाचे सश्रम कारावास

हकिकत याप्रमाणे आहे की, फिर्यादी व आरोपी आणि मृतक पिता प्रल्हादराव शेषराव घांगळे वय ४७ वर्ष रा. गुंजलेडा हे दारु पिवुन फिर्यादी आरोपी प्रदीप धांगळे व रोडवरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घाण व अश्लील शिवीगाळ करीत असल्याने आरोपीने हटकले असता त्यास अश्लील शिवीगाळ केल्याने राग अनावर होवुन रागाचे भरात आरोपीने घरातील लाकडी राफटर (दांडा) आणुन मृतकचे डोक्यावर मारुन गंभीर दुखापत करुन जिवानीशी ठार केले फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपास अधिकारी पोउपनि/अमोल कोल्हे पो.स्टे. पुलगांव सध्या नियुक्ती पो.स्टे. तुमसर जि.भंडारा यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क. ५९५/१९ कलम ३०२ भादवि नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले…

सदर प्रकरणात फिर्यादी ही आरोपीची आई असल्याने आरोपीला मदत होईल अशा आशयाचे उलट तपासात कथन केले असतांना तसेच आरोपीची भाची यांनी हीने सुध्दा आरोपीला मदत होईल अशा आशयाची साक्ष दिली असतांना देखील इतर शेजारी राहणारे साक्षीदार, पंच साक्षदार, फोटोग्राफर व पोलीस विभागाचे कर्मचारी व अधिकारी हे आपल्या भुमीकेवर ठाम असल्याने आरोपी विरुध्द गुन्हा शाबीत करण्यास सरकार पक्षाला भरीव मदत झाली. सरकारतर्फे अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्री.एच.पी. रणदीवे यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे एकुण ११ (अकरा) साक्षदार, श्रीमती घाटे व श्रीमती तिबुडे यांनी प्रत्येकी ०२ साक्षीदार तपासले त्यांना पैरवी अधिकारी, सफी/१७५ अनंत रिंगणे, यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली. अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्री.एच.पी. रणदीवे यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. श्री.व्ही.पी.आदोने सा. तदर्थ अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपीस दिनांक २४/०७/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये