जि. प. उच्च.प्राथ.पारडी बिट येथे बीटाचा प्रथम शिक्षण परिषद पार पडली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दि. 24 जुलै रोजी बीट पार्टी येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गोपाळ उदार (अध्यक्ष. शा.व्य.समिती पारडी) उदघाटक म्हणून श्निलेश वेरकाडे (सरपंच पारडी)प्रमूख पाहूने म्हणून आदरणीय खंडारे साहेब (विस्तार अधिकारी बिट -पारडी) मार्गदर्शक म्हणून तलांडे सर (केंद्र प्रमुख बिट -पारडी)आणि केंद्रातील सर्व शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पहिली तासिका
डांगे सर यांनी शिष्यवृत्तीसाठी लाभदायक उपयुक्तअशा नवनवीन क्लृप्त्या दर्जेदार उदाहरणांचा सराव देवून पहिली तासिका पूर्ण केली
दुसरी तासिका
साठे सर यांनी निपुण भारत या विषयावर घेतली उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले आणि पारडी बीटाचा आढावा घेऊन तासिका संपवण्यात आली
तिसरी तासिका
संजय मरापे सर यांनी English या विषयावर Let’s speak या घटकांवर उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले
जि.प.ऊच्च .प्राथ.शाळा.पारडी.
यांच्याकडून उत्कृष्ट असे मिष्ठान्न भोजन.चहा.ऊत्तम अशी व्यवस्था करण्यात आली. बिटातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेतील अनूभव कथन केले.
सर्व शासकीय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले.आभार प्रदर्शन कु.विठाबाई हूंडे मॅडम यांनी केले अशा प्रकारे पारडी बीटाची प्रथम शिक्षण परिषद उत्साहात पार पडली



