Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खरीप हंगामात कृषी विभागाकडून जवळखेड येथे सोयाबीन शेती शाळाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कृषी विभागच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीशाळेच्या माध्यमातून बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दिनांक 24.जुलै रोजी तालुक्यातील मौजे जवळखेड येथे तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा यांच्या अंतर्गत सोयाबीन शेतीशाळा सकाळी 9 वाजता आयोजित केली सदरील शेतीशाळेमध्ये एकत्रित कीड व रोग व्यवस्थापन सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिक विमा ,गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना , कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बांबू लागवड महाडीबीटीवरील ठिबक सिंचन यांत्रिकीकरण बाबत मार्गदर्शन केले एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापना मध्ये निंबोळी अर्क, सापळा पिके, पक्षी थांबे, फोरमन ट्रॅप इत्यादी बाबीच अत्यंत महत्त्वाचे आहे हे शेतकऱ्यांना पटवून सांगितले.

उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन शेतावर जाऊन किडीची ओळख करून फवारणी केव्हा करावी खोडमाशी, चक्रभुंग्याचे व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करून सोयाबीन पिवळी पडण्याची मुख्य कारणे चुनखडी युक्त जमीन असून त्यासाठी सूक्ष्मानंद्राची कमी असल्याने त्यासाठी झिंक व फेरस ची फवारणी करावी असे आवाहन केले पिवळ्या मोझ्याकची एक दोन झाडे दिसताच उपटून जमिनीत काढावे जेणेकरून त्या विषाणूचे संक्रमण होता कामा नये.

यावेळी संबंधित गावची कृषी श्रीकांत पडघान यांनी पिक विमा, फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक समाधान गाडेकर यांनी ठिबक तुषार यांत्रिकरण, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना याबाबत मार्गदर्शन केले श्री नामदेव शिंदे मंडळ कृषी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थापन एकात्मिक रोग व्यवस्थापन, निंबोळी अर्क, पक्षी थांबे,सापळा पिके, सोयाबीनवरील येणारे प्रमुख किडी उंटआळी, तंबाखूची पाने खाणारी आळी, खोडमाशी यांच्या व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले सदर शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषी सहायक बाळासाहेब हंडाळ यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये