एचडीएफसी शाखा देऊळगाव राजा च्या राखी अक्करबोटे द ग्रेट मराठा 2.0 ने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बँकापैकी एचडीएफसी बँकेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली असून यासाठी एचडीएफसी ने एका स्पर्धेचे आयोजन केले होते नुकताच नागपूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ,यावेळी एचडीएफसी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी देऊळगाव राजा शाखेत कार्यरत ब्रांच ऑपरेशन मॅनेजर पदावर कार्यरत राखी ईश्वर अक्करबोटे यांना एच डी एफ सी चे रिजनल हेड राजा उपाध्याय यांच्या हस्ते प्रथम पाच मध्ये आल्याबद्दल द ग्रेट मराठा 2:0 पुरस्कार देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की एचडीएफसी बँकेने राज्यातील ज्या ज्या शाखेमार्फत कामकाज चालते त्या त्या शाखेतील ब्रांच ऑपरेशन मॅनेजरच्या पदावर जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या शाखेच्या प्रगती करता जे जे उपाययोजना करून शाखेला अव्वल आणण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले व त्यांना एका भव्य कार्यक्रमात विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यासाठी देऊळगावराजांचे एचडीएफसी शाखेत कार्यरत राखी ईश्वर अक्करबोटे ब्रांच ऑपरेटिंग मॅनेजर यांना राज्यातून पाचव्या क्रमांकाचे द ग्रेट मराठा 2.0 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नागपूर येथील हॉटेल रेडिसन मध्ये एचडीएफसी चे रिजनल हेड राजा उपाध्याय यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना विविध पारितोषिक देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
ब्रांच ऑपरेशन मॅनेजर या स्पर्धेत २२० स्पर्धाकांनी सहभाग नोंदवलेला होता यामध्ये प्रथम पाच मध्ये राखी ईश्वर अक्करबोटे यांनी बाजी मारून देऊळगावराजा राजा शाखेचे नाव उंचावर नेऊन ठेवले आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देऊळगाव राजा शाखेचे शाखा व्यवस्थापक विनोद घोंगे व त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राखी अक्करबोटे यांचा सन्मान केला.