ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा घटकात मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा अभियान

नागरीकांच्या सुरक्षित्तेसाठी वाहतुकीत शिस्त निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश महाडीक उपविभाग वर्धा, तसेच जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा प्रभारी अधिकारी सहायक विजयकुमार घुले व अमंलदार वर्धा जिल्हा घटकात मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा अभियान राबविण्यात येत असुन आज दिनांक 31/10/2026 रोजी वर्धा शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली. नागरीक आणि वाहन चालकांना वाहन योग्य ठिकाणी पार्क करणे, रस्त्यावर अडथळा निर्माण न करणे दुचाकीवर हेल्मेट व चारचाकीत सीट बेल्ट वापरणे, वेगमर्यादाचे पालन करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर व मघपान टाळणे, वाहनाचे कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागरीकांनी सार्वजनिक रस्तयावर किंवा नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करु नये, रुग्णवाहिका व आपात्कालीन वाहनांना मार्ग द्यावा. आणी वाहतुकीची शिस्त राखावी असे आवाहन करण्यात आले मोहीमेचा उद्देश ही मोहिम केवळ दंडात्मक कार्यवाहीपुर्ती मर्यादीत नसुन नियमभंगाला आळा घालणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरीकांच्या सुरक्षित्तेसाठी वाहतुकीत शिस्त निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

मोहिमे दरम्यान मोटार वाहन कायदया नुसार वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालका विरुध्द एकुण 176 कारवाया करण्यात आल्या आहेत.

नियमभंग करणा-यांवर यापुढे नियमानुसार कारवाई सुरु राहणार आहे. नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित व सुरळीत वाहतूकीस सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आले. वाहतुक नियमांचे पालन करा, कोंडी टाळा आणि सुरक्षित प्रवास करा

सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंड वसुल करण्याचा नसुन वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असुन नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. लहान मुलांकडून विनापरवाना वाहन चालवुन घडत असलेले अपघात व त्यामुळे त्यांचे भविष्यावर होणारे वाईट परीणामांपासुन त्यांचे संरक्षण व नागरीकांचे जिवीताचे संरक्षण हा प्रमुख उद्देश्य मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा अभियानाचा आहे.

यापुढेही सदर मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा सर्व जिल्हाभर प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये