डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य” सरदार वल्लभभाई पटेल जयंती व ऑक्टोबर महिन्यातील सायबर जनजागृती निमित्य वर्धा पोलिसांतर्फे भव्य ‘वाकथॉन’ संपन्न!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि संपूर्ण ऑक्टोबर महिना ‘सायबर सुरक्षा महिना’ म्हणून पाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, वर्धा पोलिसांच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘WALKATHON FOR A SAFER DIGITAL TOMORROW’ (डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य) या मथळ्याखाली भव्य वाकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशन सायबरतर्फे आयोजित या रॅलीने ऑक्टोबर महिन्यातील जनजागृती मोहिमेचा यशस्वी समारोप केला.
पोलीस मुख्यालय, वर्धा येथून सकाळी ७.०० वाजता या रॅलीला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी या वाकॉनला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. “चला एकत्र करू डिजिटल भारत सुरक्षित” आणि “Walk, Leam, Stay Safe Together” असा संदेश देत या रॅलीमध्ये वर्धा पोलीस उपविभागातील मोठ्या संख्येने अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
मान्यवरांची प्रमुख उपस्थितीः
या रॅलीमध्ये खालील मान्यवर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होतेः
*पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपअधीक्षक (गृह)प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी (वर्धा) सुनील महाडिक पो. नि. स्थागुशा विनोद चौधरी सायबर पोलीस स्टेशनचे पो. नि. श्री. चंद्रकांत पाटील पो.स्टे. रामनगरच्या पो. नि. श्रीमती पौर्णिमा राखूंडे यांच्यासह वर्धा पोलीस दलातील विविध अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी झाले.
विशेष संदेश व आवाहनः
या वाकथॉनच्या माध्यमातून नागरिकांना सायबर हावजीन, मजबूत पासवर्डचा वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून सावधगिरी, अॅप्स आणि लिंक्स तपासून वापरणे तसेच आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत मोलाचा संदेश देण्यात आला.
वर्धा पोलीस दलातर्फे नागरिकांना विशेष आवाहन करण्यात येते की, सायबर फसवणूक झाल्यास कोणत्याही संकोचशिवाय तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. रॅली चे आयोजन सायबर पोलिस स्टेशन वर्धा तर्फे करण्यात आले.



