ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या पाठपुराव्याला यश

बाजार वार्ड व किल्ला वार्डात होणार विविध विकास कामे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती नगरपालिका शेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील बाजार वॉर्ड, किल्लावॉर्ड मधील माहुरे बुट हाऊस ते पारेलवार दुध डेअरी ते विठ्ठल मंदिर ते पुरातन किल्ल्या जवळील राऊत यांचे घर व पारेलवार दुध डेअरी ते जुना पोलिस स्टेशन जवळील गनगंम वार किराणा दुकान तसेच किल्लावॉर्ड येथील अविनाश राऊत ते कन्नमवार यांचे घर पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे व रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक (गट्टू) लावणे या कामकरिता ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून मंजुर करण्यात आलेला आहे.

या कामालां जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी झालेली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होणार आहे. सदर रस्त्याकरिता भद्रावती नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ८ चे माजी नगरसेवक प्रफुल चटकी यांनी दिनांक ४ मार्च २०२४ ला महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर कामरीता ५० लाख रुपयांची मागणी केली व पाठपुरावा केला परिणामी दिनांक ७ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार वैशिष्टपूर्णयोजने अंतर्गत या कामाकरीता शासनाकडून ५० लाख रुपये मंजूर केलेले आहे. प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक यांनी रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल बाजार वॉर्ड व किल्ला वॉर्ड येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये