राजुरा पत्रकार असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
८० गुणवंतांचा सत्कार : आ. देवराव भोंगळे, माजी आ. अँड वामनराव चटप यासह मान्यवरांनी केले गुणवंतांचे कौतुक

चांदा ब्लास्ट
राजुरा पत्रकार असोसिएशन, राजुरा यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज संकुल (सुपर मार्केट हॉल), राजुरा येथे सकाळी ११ वाजता राजुरा तालुक्यातील फेब्रुवारी २०२५ मध्ये इयत्ता १० वी व १२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजुरा शहर आणि तालुक्यातील ८० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, प्रमुख पाहुणे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, शिक्षण विस्तार अधिकारी चालखुरे, गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, पत्रकार डाॅ. उमाकांत धोटे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे प्रा. बी. यु. बोर्डेवार, राजुरा पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ असून कठोर परिश्रम घेऊन सर्वांनी जीवनात यशस्वी व्हावे. आई, वडील, आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले आणि कुठेही अडचण आली तर आम्हा लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांशी संपर्क साधावा आम्ही पुर्ण ताकदीने मदत करू असे मत व्यक्त केले. तर माजी आमदार अँड वामनराव चटप आणि तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी आपल्या जीवन अनुभवाचे कथन करून विद्यार्थ्यांना अपशयने घाबरून न जाता आनखी जिद्दीने संघर्ष करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे यांनी केले, सुत्रसंचालन सचिव एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष – श्रीकृष्ण गोरे, सचिव एजाज अहमद, उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, उपाध्यक्ष प्रा. प्रफुल शेंडे, कार्याध्यक्ष सय्यद जाकीर, कोषाध्यक्ष मंगेश बोरकुटे, सहसचिव साहिल सोळंके, सदस्य वसंत पोटे, मनोज आत्राम, फारुख शेख, शहनावज कुरेशी, अमित जयपूरकर, सागर भाटपल्लिवार, मंगेश श्रीराम, उमेश मारशेट्टीवार, बंडू वनकर, प्रकाश काळे, अविनाश दोरखंडे आदींनी परिश्रम घेतले.