ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अँड. अनिल वैरागडे तर सचिवपदी शशीकांत धर्माधिकारी

बाबासाहेब वासाडेच्या वर्चस्वाला मोठा धक्का

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार

मूल : संस्थापक अध्यक्ष वि.तु. नागापूरे वकील साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्ष पदी संस्थापक सचिव डाँ. मामासाहेब वैरागडे यांचे चिरंजीवाची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकारीणी मंडळाच्या निवडणूकीत अँड. अनिल वैरागडे यांची अविरोध निवड झाली तर सचिव पदाच्या निवडणूकीत निवृत्त मुख्याध्यापक शशीकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा पराभव करीत सचिव पदाची खुर्ची खेचुन आणली आहे. त्यामूळे कित्येक वर्षानंतर प्रथमच स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळावर मूलच्या स्थानिक नागरीकांनी वर्चस्व प्रस्थापीत केल्याने शहरात आनंद व्यक्त केल्या जात आहे. मंडळाच्या कार्यकारीणीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरीता अँड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष पदाकरीता अँड. प्रणव प्रमोद वैरागडे आणि अजय वासाडे, सहसचिव पदाकरीता प्राचार्य ते.क. कापगते यांचे विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही सर्व पदे अविरोध निर्वाचित झाली. कार्यकारी सदस्य म्हणून यशवंत पुल्लकवार, वैशाली वासाडे यांची अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी शशीकांत धर्माधिकारी व अजय वासाडे यांचे दोन उमेदवारी अर्ज आल्यांने निवडणूक घेण्यात आली, १४ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले. झालेल्या मतदानात शशीकांत धर्माधिकारी यांना ८ तर अजय वासाडे यांना ४ मते मिळाली. त्यामूळे शशीकांत धर्माधिकारी यांनी ४ मते अधिक मिळवित अजय वासाडे यांचा पराभव केला. कार्याध्यक्ष पदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने कार्याध्यक्ष पद रिक्त आहे.

त्यामूळे मागील 26 वर्षापासून शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर या निवडणूकीने कायमचा पडदा पडला आहे. मूल तालुक्यात शैक्षणिक विकास आता संस्थेच्या वतीने जोमात करण्यात येईल असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. अनिल वैरागडे आणि शशीकांत धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने मूल व सावली तालुक्यात विविध विद्यालय, महाविद्यालय व छात्रालये चालविली जातात. या संस्थेत 1998 पासून अंतर्गत वाद होते. हे वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने एसएलपी 10846/2018 या दाव्यावर दिनांक 23.1.2024 रोजी अंतिम निर्णय देत, 2002 ते 2007 ची कार्यकारीणी वैद्य ठरवित सहा महिण्यांचे आत सह. धर्मदाय आयुक्त यांनी नविन कार्यकारीणीसाठी निवडणूक घ्यावी असे आदेश दिले. या आदेशानुसार दिनांक 17 जुलै 2024 रोजी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल येथे निवडणूक घेण्यात आली.

शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे संपूर्ण अधिकार अँड. बाबासाहेब वासाडे कुटूंबियांकडे राहावे याकरीता सौ. वैशाली वासाडे व त्यांच्या तीनही मुलांनी अथक प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. मुलांच्या हट्टापायी अँड. बाबासाहेब वासाडे यांना या संस्थेवरील अधिकार गमवावे लागले. संस्थेवरील वासाडे यांचे वर्चस्व संपुष्टात आल्याने अनेक आर्थिक व्यवहार उघडकिस येतील. अशी चर्चा असुन स्थानिक नागरीकांनी निर्माण केलेली शिक्षण संस्था स्थानिकांनी शेवटी अथक प्रयत्नाने खेचुन आणल्याने आनंद व्यक्त केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये