ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुब्रतो मुखर्जी फुटबाॅल स्पर्धेत अल्फोन्सा सिनियर सेंकडरी स्कूल संघ विजयी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा यांनी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे दि. ८ ते १० जुलै २०२४ या कालावधी मध्ये आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धे मध्ये अल्फोन्सा सिनियर सेंकडरी स्कूल सावंगी मेघे येथील १५ वर्षाखालील विद्यार्थ्याच्या फुटबॉल संघाने सहभाग नोंदवून अग्रगामी स्कूल, मसाळा, येथील संघावर मात करून यश संपादन केले.

या स्पर्धेत अथांग ताकसांडे (गोल किपर),सक्षम पाटील, हिमांशू धोटे, अफनान खान, प्रतिक कांबळे, दक्ष पाटील, शतंनु अवथरे, उमंग जिवतोडे, झियान सैय्यद, प्रियांशू सिंग, मयंक अलोने, अभिनव सिंग, द्रूप चौधरी, अथर्व निवल, अनमीतकुमार पांडे, आयुष धाडसे, आदी विद्यार्थ्यानी फुटबॉल स्पर्धे मध्ये विशेष ठसा उमटविला. श्री. संदीप खेर यांच्या मार्गदर्शनात फुटबॉल संघाने विजय मिळविला. त्या बद्दल प्राचार्य नौव्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संघाचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये