ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजा रेड, संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 10/07/2024 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून मा. पो. नि. मनोज गभणे पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेषाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथील टाका ग्राउंड जवळ राहणारा शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष याचे घरी गांजा बाबत रेड केला असता आरोपीचे घराचे घरझडती मध्ये ओलसर गांजा वजन 532 ग्रॅम अंदाजे किंमत 15,960/- रू. चा माला आरोपीचे घरी मिळुन आल्याने सदरचा गांजा मौका जप्त पंचनामा कारवाई प्रामणे जप्त करून नमुद आरोपीविरूध्द एन डी पी एस कायदयान्वे गुन्हा नेांद करून तपासात घेतला.

 सदरची कारवाई मा. नुरूल हसन सा. पोलीस अधिक्षक वर्धा, मा. डाॅ. सागर कवडे सा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. रोशण पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्षनात मा. मनोज गभणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार पोउपनि लक्ष्मीकांत दुर्गे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देशमुख, सुनिल मळणकर, पो. ना. नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, रूपेश रघाटाटे, पो. शि. विजय हारनुर, यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये