ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध गोवंशीय जनावरे वाहतूकीवर पोलिसांचा छापा

एकूण १३ लाखांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 जिल्ह्यात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन साहेब, चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. रिना जनबंधु मॅडम, चंद्रपुर यांनी दिले असता, त्या अनुषंगाने आज तारीख ११/०७/२०२४ रोजी रात्री १ वाजता गोपनीय माहीतीच्या आधारे एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याचे खबरेवरून सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांनी बस स्थानक सावली येथे छापा कारवाईसाठी सापळा लावला असता,

 सदर अवैध गोवंशीय जनावरे वाहतुक करणारा ट्रक हा भरधाव वेगाने नेवुन पुळुन जाण्याच्या उद्देशाने मुलच्या दिशने पळाला सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांनी पाठलाग केला असता सदर ट्रक चालकास पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच आपले ताब्यातील ट्रक खेडी फाटा येथे थांबवुन ट्रक चालक व एक ईसम पळुन गेला. जप्त टाटा कंपनीचा ट्रक क. MH-३४.BG-६३०७ त्यामध्ये ३३ नग गोवंशीय जनावरे किंमत. ३,३०,०००/- रुपये व नमुद वाहन किमंत. १०,००,०००/- रुपये असा एकूण १३,३०,०००/- रुपयेचा माल मिळुन आल्याने महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम १९७६, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ व मोटार वाहन अधिनीयम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भगत साहेब, मुल यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. जिवन राजगुरू, पोहवा. विनोद निखाडे/११६९, पोअ. विजय कोटनाके / १६९७, पोंअ. कपील भंडारवार/२५५३ पोलीस स्टेशन सावली यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये