ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सदर सण उत्सव शांततेत व सौहार्द पूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आयोजित बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १७.०७.२०२४ रोजी मोहरम व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी सर्वत्र साजरे करण्यात येणार असल्याने सदर सण उत्सव शांततेत व सौहार्द पूर्ण वातावरणात पार पडावा या करिता आज दिनांक ११.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात शांतता समिती सदस्य व मोहरम आयोजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीत पो.स्टे वर्धा शहर, पो.स्टे रामनगर, पो.स्टे सावंगी, पो.स्टे सेवाग्राम येथील ठाणेदार तसेच त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे शांतता कमेटी सदस्य तसेच मोहरम आयोजक सदस्य हे पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर होते तसेच उर्वरित पोलीस स्टेशन येथील ठाणेदार आणि शांतता समिती सदस्य व मोहरम आयोजक हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सदर मिटिंगला हजर होते मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांनी स्वतः जिल्यातील पो. स्टे. ठाणेदार आणि शांतता कमेटी सदस्य व मोहरम आयोजक यांना सदर सन उत्सव दरम्यान निघणाऱ्या मिरवणूक, दिंडी या शांततेत पार पाडण्यासंदर्भात तसेच कुठल्याही समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही या संदर्भात सूचना दिल्या.

सदर बैठकीला मा पोलीस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन, तसेच अपर पोलीस अधीक्षक. डॉ सागर रतनकुमार कवडे आणि जिल्यातील ३०० अधिकारी आणि शांतता कमेटी सदस्य व मोहरम आयोजक सदस्य हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये