जून्या वैमनस्यातून जिवानिशी ठार मारण्याच्या प्रकरणात आरोपीला शिक्षा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे जि वर्धा येथे दाखल फिर्यादनुसार अजाबराव शामराव भोकटे वय वर्ष 65 रा महाकाळ ता. जि. वर्धा हे दिनांक 08/04/2019 रोजी दुपारी 7.00 वे दरम्यान नेहमी प्रमाणे घरच्या बक-या व गायी चारण्यासाठी महाकाळ गावाला लागून असलेल्या पुलाजवळील पडीत जमिनीमध्य काही वेळ चारल्यानंतर पुलाजवळील गायकवाड यांचे शेताकडील बंडयाकडे जात असतांना आरोपी रणजित रामकृष्ण धवणे, रा. महाकाळ ता. जि. वर्धा हा हातामध्ये लोखंडी रॉड/सळाख घेउन बसलेला होता. अजाबराव भोकडे तेथून जात असताना मागून आला आणि जुन्या वैमनस्याच्या रागातून अजाबराव भोकटे यांचे डोक्यावर जिवाने मारुन टाकण्याच्या उददेशाने लोखंडी रॉडने/सळाखने मारुन जखमी केले. त्यामुळे अजाबराव भोकटे हे जागीच बेशुध्द झाले. जखमी अजाबराव यांना सेवाग्राम येथे उपचारासाठी घेवुन गेले. याबाबतची तकार पो.स्टे सावंगी मेधे येथे तकार दिल्यामुळे आरोपी रणजित धवणे यांचे विरुध्द, 307 भा. द. वि. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुध्द चौकशी अंति भरपुर व सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्री. एन. बी. शिंदे यांनी अजाबराव शामराव भोकटे यांना लोखंडी डोक्यावर लोखंडी रॉडने/सळाखने जिवानिशी ठार मारण्याच्या उददेशाने गुन्हा केल्या प्रकरणी आरोपी रणजित रामकृष्ण धवणे यास 7 वर्ष संक्षम कारावास तसेच 10,000/- दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरल्यास तिन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या बाजुने श्रीमती रश्मि आर. सोमवंशी, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, वर्धा यांनी एकुण 16 साक्षीदारांचे बयाण नोंदविले आणि मौल्यवान युक्तिवाद केला. तसेच श्री आर. के. सिंगनजुडे स. पो. नि. पो. स्टे. सावगी मेघे जि. वर्धा यांनी सदर प्रकरणाचा मोलाचा तपास केला तसेच पैरवी अधिकारी अश्विनी वानखडे पोलीस कॉस्टेबल यांनी साक्षीदारांना न्यायालयांत हजर करुन मोलाची कामगिरी बजावली.