Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवनिर्वाचित खासदार सत्कार कार्यक्रमास धानोरकरांची अनुपस्थिती

सगळीकडे एकच चर्चा वडेट्टीवार यांच्यासाठी धोक्याची घंटा?

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

     सावली तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने शनिवार ६ जुलै रोजी आयोजित नवनियुक्त खासदार नामदेवराव किरसान आणि प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार आयोजित केला गेला होता हा कार्यक्रम सावली तालुका कांग्रेस कमेटी द्वारा आयोजित असला तरी या क्षेत्राचे आमदार तथा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. परंतु या कार्यक्रमाकडे चंद्रपूर – वणी-आर्णि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाठ फिरवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विजय वडेट्टीवार यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

   नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी विजय वडेट्टीवार यांनी आपली कन्या शिवाणी वडेट्टीवार हिचे उमेदवारीसाठी चंग बांधला होता. त्या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना ही जागा मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.अखेर च्या क्षणापर्यंत वडेट्टीवार यांनी आपला हट्ट लावुन धरल्याने या मतदारसंघात बहुसंख्य असलेला कुणबी समाज नाराज झाले होते. धानोरकर यांच्या विजयाने अती उत्साहित झालेल्या कुणबी समाजाने सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे दिनांक २८-०६-२०२४ ला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करुन वडेट्टीवार यांना जणू काही इशाराच दिला होता.त्यातच आज विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत आयोजित खासदार नामदेव किरसान व खासदार धानोरकर यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्याला अनुपस्थित राहून प्रतिभाताई धानोरकर यांनी आपण अजुनही वडेट्टीवार यांच्या वर नाराज असल्याचे दाखवून दिले आहे.त्यांची नाराजी हि कुणबी समाजाची नाराजी असे समिकरण धरले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुक जिंकणे अवघड जाईल कारण ब्रम्हपुरी – सावली विधानसभेत जवळ पास ९० हजार कुणबी मतदार आहेत त्यांची नाराजी पत्करणे विरोधिपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जमनार नाही,अश्यातच ब्रम्हपुरी विधानसभाची निवडणूक भाजप तर्फे लढण्यास इच्छुक असलेले सावलीतील युवा उद्योजक रोहीत बोम्मावार यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर या़चेशी असलेली जवळीक चर्चेचा विषय ठरलेला आहे.

नुकतेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रोहित बोम्मावार यांच्या सावली येथील निवासस्थानी भेट देऊन आपला अप्रत्यक्ष पाठिंबा बोम्मावार यांना दिल्याची सर्वत्र चर्चा आहे.अश्यातच आजच्या खासदार सोहळ्याला अनुपस्थित राहून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना धोक्याचा इशारा दिला आहे अशी तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये