Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पशु वैद्यकीय कोरपना कार्यालय रामभरोसे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा येथील पशु वैद्यकीय कार्यालय येथे अनेक दिवसापासून पशु वैद्यकीय डॉक्टर परमनंट नसल्यामुळे अनेक जनावरे दगावले तसेच अनेक दिवसापासून शासनाने लाखो रुपये खर्च करून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कॉटर बांधण्यात आले मात्र ते धूळ खात आहे प्राप्त माहितीनुसार संजय गणपत राऊत यांचा बैलाचा बिल्ला क्रमांक 10 5789830864 जा बैल दोन जुलै पासून चारापाणी घेत नसल्याने तीन जुलै रोजी पशुवैद्यकीय दवाखाना कोरपणा यांच्याकडे उपचारासाठी नेला त्या ठिकाणी असलेले निरांजने यांनी स्वतः उपचार करून औषध बाहेरून घेण्यासाठी लिहून दिले. दिलेल्याऔषध उपचाराने बैलांला आराम न मिळाल्याने डॉक्टर दीपक नागले यांना फोन करून सांगितले परंतु त्यांनी बैल मालकांना उडवाउडविची उत्तरे दिली. आणि बैलाची तपासणी करण्यास नकार दिला निरांजने हेच आपल्या बैलाचा उपचार करतील असे फोन द्वारे सांगितले तीन जुलै चार जुलै आणि पाच जुलै 2024 रोजी दवाखान्यात नेऊन उपचार केला.परंतु बैल उपचारास प्रतिसाद देत नाही त्यामुळे डॉक्टर नागले यांनी एकदा बैल तपासून उपचार करावा अशी फोन द्वारे वारंवार विनंती करूनही त्यांनी मी येत नाही. मला वेळ नाही आहे.

निरांजनेच उपचार करतील असे सांगून निरांजने या दवाखान्यातील सेवाकाकडून निदान करवून घेतले. शेवटी वेळेवर योग्य निदान व उपचार न झाल्याने बैल 6 जुलै रोजी 11:30 वाजता मरण पावला. असाच प्रकार 2023 मध्ये सुद्धा त्याच कस्टकरासोबत घडला. निरांजने आणि तत्कालीन डॉक्टरांचे हलगर्जीपनाने एक बैल मरण पावला तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी त्यांचे पेक्षा निरांजनेलाच जास्त समजते त्यालाच सांगा आणि तोच उपचार करेल असे सांगून प्रत्यक्ष बैलाचे निरीक्षण करण्यास नकार दिल्याने बैल दगावला.त्याचा शवविच्छेदन अहवाल सध्या उपलब्ध आहे. तेव्हा डॉ नागले यांनी कास्तकारास तक्रार करण्यापासून रोखले आणि यानंतर असे होणार नाही असे आश्वासन देऊन ,” तुमचे जनावरांना काही आजार झाल्यास मला फोन करून सांगा” असे सांगितले. मात्र डॉक्टरांनी लक्ष न दिल्यामुळे परत एकदा, एक वर्षाचे आत दुसरा बैल दगावला. असे प्रकरण बऱ्याच शेतकऱ्यांसोबत झाल्याचे समजते.

पण तक्रार केल्यास काही निष्पन्न होणार नाही. डॉक्टरांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे बरेच पशुधन विभागातील कर्मचारी खाजगीत बोलत असल्याचे ऐकायला मिळते . त्यामुळे जास्तच कोणी तक्रारीची भाषा बोलू लागला तर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीत बैल मरण पावला असे खोटे दाखवून, पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून प्रकरण मिटविल्या जाते. शासन,प्रशासन आणि विरोधक कोणीच संबंधित प्रकरणाकडे लक्ष देत नाही. महागाई, मजूर टंचाई, शेतमालाला आणि दुधाला अल्प दर, निसर्गाची अवकृपा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, म्हाताऱ्या आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्च, दुबार पेरणीचे संकट,त्यात औताचा बैल मरण पावल्याचे संकट कोसळल्यास वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आधीच नक्षलग्रस्त असलेल्या भागात,अशी प्रकरणे वारंवार घडत असल्याने,पुन्हा नव्याने नक्षलवादी मानसिकता घडण्यास वेळ लागणार नाही. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे असंवेदनशील प्रशासन राहील अशी परिसरात चर्चा असल्याचे समजते. करिता संबंधित कार्यालयाने या प्रकरणाची उच्च स्तरीय विभागीय चौकशी करून, दोशीवर सक्त कारवाई करावी आणि वारंवार अशी प्रकरणे घडूनही दाबण्यात आल्याने प्रत्यक्ष गुप्तपणे अहवाल मिळवून चौकशी करावी, अशी प्रकरणे पुन्हा होऊ नयेत म्हणून कोरपणा या ठिकाणी संवेदनशील मनाच्या तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व पशुपालकाची गैरसोय टाळावी. जर पशुवैद्यकीय अधिकारी ना दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा संजय गणपत राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये