ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

जी.प.शिक्षणाधिकारी (माध्य.)यांनी केली डिजिटल वर्गखोल्यांची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

      भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ५ ते १२ मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

      शाळा प्रवेशोत्सव गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाच्या सूचनानुसार प्रत्येक शाळेला हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने विश्वशांती विद्यालयात निकीता ठाकरे शिक्षणाधिकारी (माध्य.)चंद्रपूर,पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार, उपाध्यक्ष अनिलजी स्वामी,कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,  विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांचे उपस्थितीत प्रवेशोत्सव २०२४-२५ हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी संपूर्ण शाळेत असलेल्या सोयी सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या डिजिटल वर्गखोल्यांची सुद्धा पाहणी केली.

     सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली.उपस्थित मान्यवर आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांनी नव्याने प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा शाळेत आल्याचा प्रचंड उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये