ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- सांझ विहार म्युझिक अकॅडमी शाखा ब्रह्मपुरी, नागभिड आयोजित पंचमदा यांच्या वाढदिवसानिमित्त जगदीश गोमिला यांच्या संकल्पनेतून “स्वर उमंग”गायन, नृत्य,वाद्य वादन याची एकापेक्षा एक प्रस्तुती शनिवार दिनांक २९ जूनला सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे पार पडले

शहरातील प्रायोजक व विशिष्ट लोकांच्या सहकार्याने हा भव्य दिवस सोहळा संपन्न झाला प्रामुख्याने या उद्घाटनकार्यक्रमाला ब्रह्मपुरी शहराचे तहसीलदार उषा चौधरी मॅडम,माजी प्राचार्य देविदास जगनाडे सर,तुलसी राईस ब्रँड ऑइल चे सर्वेसर्वा मोहता सर, डॉ. प्रशांत राखडे सर, माझी नगरसेवक मनोज वठे, महेंद्र कसारे सर, मुकुंद गुप्ता इंजि. भूषण रामटेके,

डॉ. मनिषा बनवाडे प्रामुख्याने उपस्थित होते व सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला विशेषता हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला वेगवेगळी आर डी बर्मन यांची इन्स्ट्रुमेंटल गाणी वाजवून प्रेक्षकांची दाद ,टाळ्या घेऊन मने जिंकली सांझ विहार म्यूझिक ऍकॅडमी दरवर्षी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.

तीन महिने चाललेल्या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन कार्यक्रमात उत्तमरित्या सादरीकरण केले

अकॅडमीचे संचालक, संगीतकार, गायक जगदीश गोमीला यांच्या मार्गदर्शनात सांझ विहार चे प्रशिक्षक अभिजीत गणवीर अक्षय पारशिवे यांनी विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतले.

स्वर उमंग या कार्यक्रमात प्रेक्षकांना मंचा सोबत बांधून ठेवण्याचे काम निवेदक दीपक सेमस्कर यांनी ,पंचमदा यांच्या संगीतमय जीवनाला उजाळा देत त्यांचे अनेक किस्से सांगितले. सुरुवातीलाच सर्व विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध असे शोले चित्रपटाची थीम सॉंग सादर केली

छोट्या छोट्या मुलांनी गिटार, कीबोर्ड,ड्रम,बँजो वाजून गाजलेल्या जुन्या गीतांना उजाळा दिला, तसेच मुकेश कुमार, भारती जनबंधू, श्रेयसी रामटेके, जुई शेंडे, डॉ.प्रशांत राखडे ,भारत मेश्राम यांनी गाणी सादर केली. ध्वनी व प्रकाश योजना श्री गुरुदेव चे विनोद चिंचेकर यांनी उत्तमरीत्या पार पाडली कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता

चिदानंद सिडाम,केशव खोब्रागडे, प्रथमेश रहाटे, रोहन बागडे, रजत राऊत, प्रणय देवगडे, शैलेश भूरसे, गणेश बनसोड, शरद अंबादे, राई बांडे, संपूर्ण सांझ विहारचे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये