ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवाजवी वीज बिलाविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

सात दिवसांत प्रश्न न सुटल्यास एम. एस. ई. बी. कार्यालयाला टाळे ठोकन्याचा इशारा : सुरज शाहा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती शहरातील भगराम वॉर्ड येथील रहिवासी सौ. गीता चंद्रदीप उईके यांना महावितरण (MSEDCL) कडून नोव्हेंबर २०२५ महिन्याचे तब्बल ३४९६० रु. इतके अवाजवी, अन्यायकारक व संशयास्पद वीज बिल देण्यात आले आहे. सदर घरात फक्त २ सदस्य वास्तव्यास असून एकही ए. सी. नसताना तसेच ६ महिन्यांपूर्वी नवीन मीटर बसवूनही इतके प्रचंड बिल कसे येते, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या गंभीर विषयावर शिवसेनेच्या वतीने भद्रावती महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.

हे निवेदन देताना शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात, युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात आणि युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, घरगुती मर्यादित वापर असूनही इतके प्रचंड बिल येणे हे मीटर फ़ॉल्टी किंवा रिडींग घोटाळ्याचा संशय निर्माण करते. नवीन मीटर असूनही अचानक युनिट्स वाढ दाखविणे हे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. सर्वसामान्य नागरिकांची अशी आर्थिक व मानसिक छळवणूक शिवसेना कदापि सहन करणार नाही.

यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम इशारा दिला की येत्या सात दिवसांच्या आत सदर वीज बिल दुरुस्त करून योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर शिवसेनेच्या वतीने भद्रावती MSEB कार्यालयाला टाळे ठोकू आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महावितरण प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील.

यावेळी पीडित घरमालक गीता चंद्रदीप उईके, शिवसेना उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, सागर भाऊ कोल्हटकर, युवासेनेचे अनोखा भाऊ गेडाम तसेच शिवसेना–युवासेनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये