पीएम श्री केंद्रीय विद्यालय ओ.एफ. चांदा येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी चांदा येथे वार्षिकोत्सव–२०२५ उत्साह व सांस्कृतिक वातावरणात विद्यालय परिसरात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने करण्यात आली. ओ.एफ. चांदा येथील मुख्य महाव्यवस्थापक व विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण कुमार पांडेय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती विश्वकर्मा यांनी वार्षिक अहवाल सादर करताना शैक्षणिक यश व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रकाश टाकला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक करून शिस्त व मूल्यांसह प्रगती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने करण्यात आला.



