ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालयाचा ओम शिवरकर पावर लिफ्टिंग स्पर्धेत नागपूर विभागावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           स्थानिक भद्रावती येथिल विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीतील विद्यार्थिनी ओम विनोद शिवरकर , वयोगट 19 वर्षे खालील जिल्हा स्तरीय पावर लिफ्टिंग वजन गट 53 किलो स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करीत चंद्रपूर जिल्हा स्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून नागपूर विभागीय स्पर्धेत खेळण्याकरित पात्र झाला.

या या विद्यार्थ्याला क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका कु. संगीता आर. बांबोडे यांचे मार्गदर्शन लाभले, त्याच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. मालेकर, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा, दाते, प्रा. बैरम, प्रा. खोके, प्रा. बेलगावकर, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये