ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्र.रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर देऊळगाव राजा येथे ब्र .रघुनाथ गुरुजी परभणीकर यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त ह भ प गुरुवर्य डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेची भक्तीमय व उत्साही वातावरणात सप्ताहाची सांगता

     संत गजानन महाराज मंदिर कुंभारी येथे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक ९ ते १६ डिसेंबर या दरम्यान करण्यात आले .गुरुवर्य ह भ प डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या सुमधुर आवाजात भागवत कथा संपन्न झाली. शहरांमध्ये पुष्पहाराने सजवलेल्या रथा मधून वाजत गाजत भजनी मंडळ, वारकरी  टाळकरी, भक्तगण यांच्या उपस्थितीत गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर यांची अभिष्टचिंतन सोहळा निमित्त मिरवणूक काढून भागवत कथेची सांगता झाली.

     अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद् भागवत कथा, काकडा भजन, विष्णुसहस्रनाम ,हरिपाठ व दररोज संध्याकाळी हरी किर्तन झाले .हरी कीर्तनामध्ये हभप चंद्रकांत महाराज गुंजकर, ह भ प निकम महाराज गुरुजी, हभप आचार्य योगेश महाराज पाचपोर, हभप ॲड चिंदबरेश्वर महाराज साखरे, हभप भीमाशंकर गुरुजी, हभप भगवान महाराज वरवंड, हभप उमेश महाराज भाकरे जोग संस्था व काल्याचे किर्तन ह भ प डॉ भगवानबाबा आनंदगडकर यांचे झाले. यावेळेस पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भक्तगण आदींची उपस्थिती होती.

       अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गुरुवर्य ह भ प डॉ भगवान बाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादानेह भ प लक्ष्मण महाराज आंबोरे हभप प्रवीण सपाटे प्रशासन अधिकारी पंचायत समिती सिदखेडराजा, हभप पांडुरंग गुरुजी वाघ महाराज पांगरी यांच्या मार्गदर्शनातसद्गुरु जोग महाराज परंपरेनुसार रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले विशेष सहकार्य ह भ प निकम गुरुजी ह भ प जनार्दन कोल्हे गणेश खरात दिगंबर कोल्हे ह भ प सपकाळ महाराज रामेश्वर कोल्हे हभप अनील महाराज सपाटे, दिपक सपाटे,सुरज गुप्ता तथा समस्त भक्तगण व संत गजानन महाराज मंदिर संस्थान कुंभारी भिगाव तुळजापूर पिंपळगाव चिलमखाँ पांगरी माळी शिराळा गोळेगाव कुंभारी देऊळगाव राजा येथील टाळकरी वारकरी महिला भजनी मंडळ व भक्तगण दररोजचे अन्नदाते यांनी अथक परिश्रम घेतले.आमदार मनोज कायंदे आणि सतीश कायंदे यांनी दिलेल्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये