गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लबाडनुकीने अज्ञात आरोपीने सोन्याची पोत केली चोरी

गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            मौजा इसापुर येथे राहणारे त्रंबक दौलतराव निखाळे हे घरासमोर उभे असतांना मोटर सायकलने दोन अज्ञात इसम त्रंबक निखाळजे यांच्या घरासमोर आले व त्यांनी त्रंबक निखाळजे यांना म्हटले कि, आम्ही सरकारी एजंट असुन लोकांना शासनाचे बकऱ्याचे अनुदान मिळवुन देत असतो असे बोलुन तुमचे तीन लक्ष रुपये सरकारी अनुदान मंजुर झाले आहे, त्याकरीता तुम्हाला देवळी येथे सरकारी कार्यालयात येवुन 35,000/- रु. भरावे लागणार आहे. तेव्हा त्रंबक निखाळजे यांनी पैसे नसल्याने पत्नीची सोन्याची पोत गहाण ठेवुन पैसे भरतो असे म्हणुन घरातुन सोन्याची पोत आणली असता सदर अज्ञात आरोपीतांनी दाखवा असे म्हणुन ती पोत आपल्या ताब्यात घेतली व त्रंबक निखाळजे यांच्या बोगस कागदपत्रावर सहया घेतल्या व अज्ञात आरोपीतांनी स्वतःचा खोटा नंबर त्यांना दिला. यानंतर त्रंबक निखाळजे यांना म्हटले कि, तुम्ही कपडे घालुन व आधारकार्ड घेवुन तयार रहा आम्ही बकऱ्याचे फोटो काढण्याकरीता फोटोग्राफर घेवुन येतो असे म्हणुन सोन्याची पोत घेवुन दोन्ही अज्ञात आरोपी सोन्याची पोत घेवुन मोटर सायकल वाहनाने निघुन गेले व परत आले नाही. करीता त्रंबक निखाळजे यांना आपली लुबाडणुक झाल्याचे समजुन आल्याने त्यांनी पो.स्टे. देवळी येथे याबाबत दिलेल्या तकार वरुन पो.स्टे. देवळी येथे अप. क. 536/24 कलम 420, 170, 34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन सदर अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे सुरु असतांना त्रंबक निखाळजे यांनी अज्ञात आरोपीतांच्या सांगितलेल्या वर्णनावरुन खबरी नेमुण सतत माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाच्या प्रॉपर्टी सेलला गुप्त बातमीदाराकडुन खात्रीाशिर माहिती मिळाली कि, सदर गुन्हा हा अशोक नगर, तिवसा, जि. अमरावती येथे राहणारा रामराव ढोबळे व त्याच्या एक मित्र असे दोघांनी मिळुन केला आहे. वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवुन रामराव ढोबळे बाबत तिवसा येथे माहिती घेवुन त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सुरवातीलस रामराव ढोबळे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यानंतर रामराव ढोबळे यास विश्वासात घेवुन सखोल विचारपुस – केली असता रामराव ढोबळे याने सांगितले कि सदर गुन्हा हा त्याने व त्याच्या एक मित्र अमोल धानोरकर अश्या दोघांनी मिळुन केला असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयात आरोपीने गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटर सायकल व त्रंबक निखाळजे यांच्या पत्नीची सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे. रामराव ढोबळे हा अश्यालोकांच्या अज्ञातेचा फायदा घेवुन त्यांची लुबाडणुक करण्याचा सवईचा आहे. रामराव ढोबळे याने यापुर्वी वरोरा, चंद्रपुर व पुलगांव, जि. वर्धा येथे अश्याच प्रकारचे गुन्हे केले आहे. शासनाचे अनुदान मंजुरीकरीता शासन लोकांकडुन अशी कोणतीही रक्कम घेत नसते करीता लोकांनी अश्या बनावटी एजंटच्या कृत्यास बळी पडू नये असे आवाहन पोलीस विभाकडुन लोकांना करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, पो.नि. श्री. संजय गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पो.उप नि. सलाम कुरेशी, पो.हवा. नरेंन्द्र पाराशर, नापोशी नितीन ईटकरे, पो.शी. संघसेन कांबळे, मीथुन जिचकार, चालक पो.हवा गणेश खेवले व सायबर शाखेचे अनुप कावळे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये