ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम

जिल्हा सामान्य रुग्णालय, बाह्य रुग्ण विभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

२६ जुन हा दिवस जगभरात जागतिक अंमलपदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे मा. डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली जनजागरण रॅली, जनजागृती कार्यक्रम आणि पथनाट्य आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम जनजागृती रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी ८.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिव्हील लाईन्स येथून मा. पोलिस अधिक्षक कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जनजागरण रॅलीला मा. नुरुल हसन, पोलिस अधिक्षक वर्धा, जिल्हा परिषद वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. रहेमान, मा. डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा मा. डॉ. राज पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोलिस अधिक्षक कार्यालय, सुभाष पुतळा, जिल्हा सामान्य रुग्णालय, बस स्थानक, बजाज चौक, शनि मंदिर चौक, मुख्य बाजार पेठ मार्गे परत सुभाष पुतळा, इतवारी मार्केट येथे फिरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये शासकिय नर्सिंग महाविद्यालय, कासाबाई नर्सिंग महाविद्यालय, पोलिस विभागाचे अधिकारी/कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली समोर भारताचा तिरंगा ध्वज आणि पोलिस खात्याचा ध्वजधारी तसेच सोबत असलेला पोलिस बॅड रॅलीचे विशेष आकर्षण होते. रॅली दरम्यान रॅली सहभागी लोक, विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ विरोधी घोषणा देत जनजागृती करण्यात आली. रॅली दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागरण पत्रकांचे वितरण करण्यात आले. रॅलीला शहरातील नागरिकांचा उत्स्फूत प्रतिसाद लाभला.

रॅली पश्चात जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे बाह्य रुग्ण विभागात अंमली पदार्थ विरोधी दिवस जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुखा वक्ते म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचावर डॉ. चकोर रोकडे निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.), डॉ. आशिष सोनी, दंतरोग तज्ञ, डॉ.

सुदर्शन हरले मनोरोग तज्ञ, डॉ. नम्रता सलूजा, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, प्रभारी अधिसेविका श्रीमती इंदिरा शेडे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती शालिनी कौरती आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या दिवसी साजरा होत असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होत असलेल्या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मा. डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. इतर मान्यवरांनी देखील पुष्पार्पण करुन आदरांजली दिली. या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा यांनी अंमली पदार्थ सेवनाचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थावर होणारे दुष्परिणाम, अंमली पदार्थ सेवनापासून परावृत्त होण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे उपलब्ध औषधोपचार व समुपदेशन आदी सोई सुविधांविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली व उपलब्ध सेवांचा लाभा घेण्याचे आवाहन केले. डॉ. आशिष सोनी दंतरोग तज्ञ यांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुदर्शन हरले, मनोरोग तज्ञ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. केवल शेंडे, समाजसेवा अधिक्षक (मनो.) यांनी तर आभार प्रदर्शन श्री. राहुल बुचुंडे समुपदेशक यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थापासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली. सर्व उपस्थितांनी उभे राहून एका सुरात शपथ ग्रहण केली व अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश समाजात सर्व दूर पसरविण्याचा निर्धार व्यक्त केला.

यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आकस्मिक विभागासमोर शासकियvपरिचारिका महाविद्यालय, वर्धा येथील प्रथम वर्षाच्या परिचारिका विद्यार्थिनीनी दारु/अंमली पदार्थ सेवनाचे भिषण दुष्परिणाम दाखविणारे पथनाट्य उपस्थित रुग्ण बांधव वbनातेवाईकांसमोर सादर केले. या जनजागृतीपर पथनाट्याला उपस्थितांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळाला. परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले पथनाट्य उपस्थितांची दाद मिळवून दिली.

वरील सर्व अंमली पदार्थ विरोधी जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुदर्शन हरले, मनोरोग तज्ञ, श्री. केवल शेंडे, समाजसेवा अधिक्षक, श्री.सच्छिल सोनोने, समुपदेशक, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या श्रीमती मोनाली मोहुर्ले मानसशास्त्रज्ञ, श्रीमती किरण दिघडे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, श्रीमती रिता थूल मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, श्रीमती मिनल वाहाणे, कम्युनिटी नर्स, श्रीमती दिपाली इंगळे,मनोरोगतज्ञ परिचारिका, श्रीमती श्वेता गावंडे, रेकॉर्ड किपर, श्री. राहुल कठाणे, केस रजिस्ट्री असिस्टंट, शालेय आरोग्य कार्यक्रमाचे श्री. वांढरे, तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलूजा, समुपदेशक श्री. राहुल बुचुंडे, श्री. हर्षल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे प्र. कार्यक्रम अधिकारी नुरुल शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

शासकिय परिचारिका महाविद्यालय, कासाबाई नर्सिंग महाविद्यालय येथील परिचारिका विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचारी वृंद यांचे रॅली व पथनाट्याच्या कार्यक्रमाला विशेष योगदान लाभले. पोलिस अधिक्षक कार्यालय पोलिस प्रशासन, पोलिस अधिकारी/कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी, परिचारिका भगिनी यांचे सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेच्या करिता मोलाचे योगदान लाभले.

वर्धा शहरातील नागरिकांचा वरील सर्व कार्यक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये