ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.चंदनखेडा शाळे तालुक्यातुन प्रथम

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग द्वारा "मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ, सुंदर शाळा" स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग द्वारा आयोजित “मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ, सुंदर शाळा” सन २०२३-२४ घेण्यात आली होती.या स्पर्धेत PM SHRI जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा ही शाळा तालुक्यातून “प्रथम पुरस्काराची” मानकरी ठरली होती.

         त्या स्पर्धेत प्रथम,द्वितिय,तृतीय अशा शाळा निवडण्यात आल्या होत्या.भद्रावती तालुक्यात जवळपास सर्वच शाळा स्पर्धेत उतरल्या होत्या पण या स्पर्धेचे मुल्यमापन निकषामध्ये व त्याची पुर्तता करणा-या शाळांच्या गुणांकनात जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा तालुक्यात अव्वल ठरली होती.मुल्यमापन निकषात शाळा व शाळा परिसर,विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा,सहशालेय उपक्रम,आरोग्यविषयक जागृती,सामाजिक सहभाग,वृक्षारोपन, मुलींचे आत्मसंरक्षण,बचत बँक,राष्ट्रीय उपक्रमातील सहभाग,मासीक पाळी व्यवस्थापन,लिंग समभाव उपक्रम,वैज्ञानिक जाणीव जागृती,क्रिडा,सांस्कृतिक तथा व्यक्तिमत्व विकास इत्यादी उपक्रमात शाळेचा विद्यार्थी केंद्रीत व स्वयंशासीत असलेला सहभाग याआधारे ही शाळा अव्वल राहिली.

          महाराष्ट्र शासनाने घोषीत केल्याप्रमाणे पुरस्काराचे बक्षीस आर्थिक स्वरुपात ३ लक्ष रुपयेच्या धनादेशाचे वितरण पं.स.भद्रावती येथे एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी मा.आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी यांचे हस्ते तर मा.डाँ.प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी,तसेच मा.शिद्दमशेट्टीवार वि.अ. यांचे उपस्थितीत,शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.प्रतिभा गुंडमवार यांना ३ लक्ष रुपयाचा धनादेश सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.

         सदर स्पर्धेत उतरण्यासाठी तथा यश प्राप्तीसाठी मा.नयन जांभुळे सरपंच तथा समस्त ग्रा.पं.कमेटी , मा.अनिल कोकुडे अध्यक्ष व समस्त शा.व्य.समिती, मा.यशवंत महाले कें.प्र. तसेच सौ. अनिता आईंचवार मु.अ. त्याचप्रमाणे शाळेचे जेष्ठ शिक्षक राजेश गायकवाड,पंडीत लोंढे,सुभाष कुंभारे,अर्चना कुंभारे,अरविंद मेश्राम,भावना गुंडमवार,यशवंत मगरे या सर्व शिक्षक वृदांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले, या यशाचे शिलेदार म्हणुन सर्वांचा सहभाग तथा मार्गदर्शन मोलाचे ठरले.शाळेला प्राप्त झालेल्या बहुमानाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये