ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध करा

मानवाधिकार पार्टीचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने शहर तथा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा व सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे युवा विदर्भ अध्यक्ष डॉक्टर विश्वजीत मुखर्जी यांच्या नेतृत्वात मानवाधिकार पार्टीतर्फे चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर मुखर्जी यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीबाबत अवगत केले व त्वरित सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.

त्वरित सुविधा उपलब्ध न केल्यास पार्टीतर्फे आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध नसून ईसीजी मशीन सुद्धा नाही. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त उपचार मिळत नाही. याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधेसह पुरेसा औषध साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मानवाधिकार पार्टीचे युवा विदर्भ अध्यक्ष डॉक्टर विश्वजीत मुखर्जी, राष्ट्रीय प्रभारी तपन राय व अन्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये