गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. सावंगी (मेघे) पोलीसाकडुन मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

यातील फिर्यादी रविकांत मनोहरलाल कोटक, वय 47 वर्ष रा. दावत हॉटेल जयक, रावत रेसिंडसी बिल्डींग, सावंगी मेघे ता.जि. वर्धा यांचे राहते घराचे बाजुला त्यांची मोटर सायकल हिरो होंडा स्लेंडर कं. एम.एच. 32 एच 3041 काळया निळ्या रंगाची अंदाजे किं. 20,000 रु. ची ठेवली असता दिनांक 22/06/2024 चे 11.30 वा. ते दिनांक 23/06/2024 चे सकाळी 09.30 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा फिर्यादीच्या तोडी रिपोर्ट वरुन पोस्टेला अप क. 429/24 कलम 379 भादवी अन्वये सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हा दाखल होताच आरोपी व मुद्देमालाचे षोधार्थ पोलीस पथक गेले असता, मुखबीर कडून खात्रीषीर खबर मिळाली कि, एक इसम याने काल दिनांक 23/06/2024 रोजीपासुन एक मोटर सायकल कोठुन तरी चोरून आणलेली असुन तो हल्ली षिखबेडा सावंगी मेघे येथील स्मषाननुमीतील बसण्याचे बेंचवर झोपुन आहे व चोरलेली गाडी सुध्दा तेथेच आहे. अष्या मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता एक इसम व मोटर सायकल मिळून आल्याने त्या हजर मिळून आलेल्या इसमास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अर्जुनसिंग सिंकदरसिंग बावरी यय 27 वर्षों रा. षिखबेडा, तळेगांव षा.पं. ता.आर्वी, जि. वर्धा असे सांगितले त्यांचे ताब्यात असलेल्या नमुद वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली व जागीच विष्वासात घेवुन विचारपुस केली असता. त्याने सदरची मोटर सायकल सावंगी मेघे परीसरातुन चोरल्याचे कबुल केले. दोन पंचासमक्ष सदरची मोटर सायकल पंचनाम्याप्रमाणे जु.किं. जु. किं 20,000/रु चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब, अपर पोलीस अधीक्षकसागर कवडे, साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेष्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहायकपोलीस निरीक्षक संदिप कापडे सा, ठाणेदार, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणपथकातील पोलीस अंमलदार पोहवा सतीष दरवरे, निलेश सडमाके, अनिल वैद्य, नापोशि स्वप्नील मोरे, पोषि निखील फुटाणे, अमोल जाधव सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये