गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या सुंगधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त

सदरचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करून आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असता, मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा नामे हनुमंत रहाटे यांचे घरी अवैधरित्या सुंगधित तंबाखू व गुटख्याचा साठा लपवून ठेवला आहे, अशी खात्रीषीर माहिती मिळाल्याने सदर माहीती पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे यांना देवून त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा नांदगांव येथे पोस्टाँप सह रवाना होवून नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी यांस ताब्यात घेवून त्याचे मामाचे राहते घरी पोलीस स्टाँपचे मदतीने घरझडती घेतली असता घरझडतीत १) व्हिआयपी गोल्ड कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका चुंगडीमध्ये 21 पॉकीट अष्या एकूण 28 चुंगडयामध्ये 588 पॅकेट प्रती पॅकेट 250 रू प्रमाणे 1,47,000 २) गोल्ड कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका चुंगडीमध्ये 21 पॉकीट अष्या एकूण 36 चुंगडयामध्ये 756 पॅकेट प्रती पॅकेट 250 रू प्रमाणे 1,89,000, ३) मन गोल्ड 5 स्टॉर कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका चुंगडीमध्ये 21 पॉकीट अष्या एकूण 11 चुंगडयामध्ये 231 पॅकेट प्रती पॅकेट 250 रू प्रमाणे 57,750. ४) माजा 108 कंपनीचा सुंगधित तंबाखू 200 ग्रॅम वजनांचे टिनाचे सिलबंद झाकण असलेले डब्बे असे एकूण 60 डब्बे प्रती डब्बा किं. 935 रू प्रमाणे 6,545. ५) प्रिमीयम राजश्री कंपनीचा सुंगधित गुटखा तंबाखू दोन बॅगमध्ये ज्यामध्ये एकूण 46 पॅकेट ( प्रत्येकी बॅग 23 पॅकेट) असलेले प्रत्येक पॅकेटमध्ये 25 लहान पुडया ज्याचा बॅच क्रमांक BPE24 असा असून प्रती पॉकेट 270 रू प्रमाणे 12,420, ६) एका कापडी थैलीमध्ये विमल कंपनीच्या सुंगधित गुटखा तंबाखूचे एकूण 60 पॉकेट प्रत्येकी पॅकेटमध्ये 30 लहान पुडया ज्याचा बॅच क्रमांक HP/05/2024 असा असून प्रती पॉकेट 120 रू प्रमाणे 7,200, ७) Black Label – 18 कंपनीच्या सुंगधित तंबाखूचे एकूण 49 पॉकेट प्रती पॉकेट 22.50 रू प्रमाण 1,102.50 पैसे,,घरासमोर रोडचे बाजुला उभी असलेली मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 ची पाहणी केली असता ८) मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 मध्ये रिमझिम नं. 1 कंपनीचा सुंगधित तंबाखू 1 किलो ग्रॅम वजनांची एक चुंगडीमध्ये 10 पॉकीट प्रती पॅकेट 550 रू प्रमाणे 5,550,९) मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 मध्ये ठेवून असलेल्या ईगल हुक्का षिषा कंपनीचा सुंगधित तंबाखू 400 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे दोन प्लॉस्टीकच्या लहान चुंगडीमध्ये 20 पॉकीट प्रती पॅकेट 640 रू प्रमाणे 12,800. १०) एक जुनी वापरती गोल्डन रंगाची मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 1,50,00 जुमला किंमत 5,89,367 रु.50 पैसे चा माल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक नुरूल हसन सा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत व मा.प्रविन मुंडे, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे,पोना सुनिल मेंढे, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयात सुंगधित तंबाखू व गुटख्याचा साठा हा कुठून आणला याबाबत तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये