ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डोंगरगाव खडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       तालुक्यातील मौजा डोंगरगाव खडी येथील शेतकरी विजय मारोती बोथले रा. डोंगरगाव खडी पोस्ट डोंगरगाव तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर वय 50 वर्ष धंदा शेती यांनी काल दिनांक 22/6/2024 रोजी पेरणीच्या हंगामा वेळी लागवडी करिता व इतर लोकांच्या कर्जापाई अखेर पाण्यात बुडून आत्महत्या केली.

त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतकाला 6 एकर जमीन चोपण रिट सर्वे क्र. 76/2 असून त्यावर सीडीसी बँक नंदोरी, सोसायटी डोंगरगाव खडी चे 200000 दोन लाखाचे व इतर काही लोकांकडून कर्ज घेतले होते.

त्यांचे मागे त्यांची पत्नी गिरजा विजय बोथले वय 45 वर्ष, मुलगा आशिष विजय बोथले, 31वर्ष, अशोक विजय बोथले 28 वर्ष, व आई व वडील असा मोठा परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये