ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    – चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने तालुक्यातील दहावी व बारावी तालुका प्रथम गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केला जातो त्या अनुषंगाने सावली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील मार्च 2024 च्या दहावी व बारावीतील कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली येथे दिनांक 18/6/2024 ला आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य एन.एल. शेंडे,प्रमुख पाहुणे पंचायत समिती सावली चे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोन्डे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मुख्याध्यापक तथा प्राचार्य विलास लोखंडे, माजी केंद्रप्रमुख लोमेश बोरेवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष परशुराम समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील विश्व शांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली ची 12वी विज्ञान शाखा प्रथम काजल परशुराम प्रधाने(86.70) भयाजी पाटील भांडेकर कनिष्ठ महाविद्यालय कापसी ची कला शाखा प्रथम तनुजा दामोधर भांडेकर (85.17) विश्व शांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली वाणिज्य शाखा प्रथम कल्पक बापूजी पोहरे (82.50) तर एस. एस.सी तालुका प्रथम पि.एम. श्री. जिल्हा परिषद हायस्कूल पाथरी ची ख़ुशी प्रशांत उंदीरवाडे (92.40) यांना प्रशस्तीपत्र, मोमेन्टम, व पुष्पगुछ देऊन मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच गुणवंत विद्यार्त्यांच्या मुख्याध्यापकांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य परशुराम समर्थ, संचालन मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार आभार मुख्याध्यापक किरण खोब्रागडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रशेखर पिदूरकर, परशुराम निकुरे, संदीप कामडी,सुरेश डोईजड., विवेक बुर्लावार, चौधरी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये