Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल झाले विवाहबद्ध

प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला चंदनखेडा आदर्श गावात प्रेमया विवाह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

         तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने मांगलगाव येथील शुभम रमेश भुते (30) व कवडसी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील क्षृतिका मारोती राणे (1८) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.

दिनांक १७ जुन २०२४ ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई – भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई व भावा कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह १७ जुन २०२४ सोमवार ला. सायंकाळी ६.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.

यावेळी मुलाची आई बेबी रमेश भुते, भाऊ चंद्रशेखर भुते,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, मांगलगाव चे सरपंच प्रफुल्ल कोलते,पुरुषोत्तम मुडेवार,प्रभाकर दोडके, लोकेश कोकुडे, भानुदास भोस्कर,धनराज टोंगे,नामदेव गारघाटे,अमोल काकडे, चंद्रशेखर भुते,भगवान बतकी,प्रकाश गारघाटे,बालाजी महागमकार,वासुदेव घाटे, प्रविण भरडे, राहुल कोसुरकार, देवानंद पांढरे, आशिष बारतिने,हरिलाल बाटबरर्वे,राजु मांदाळे,राजु रंदये, जगन सोनुले,संभाजी दडमल,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, अमृता कोकुळे,शंकुतला चलपे,शांता हनवते,वर्षा पाचभाई, अर्चना भुते,छयला गारघाटे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, भाग्यश्री सोनुले,वनिता नन्नावरे,दिवाकर गोहणे,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये