Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारू व चारकचाकी वाहनासह एकुन 6 लाख 95 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 10.06.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी गोपनिय माहीती वरून पोददार बगीचा, रामनगर वर्धा येथे नाकेबंदी करून आरोपी प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावर 1) शंकर किशनचंद दानानी वय 45 वर्ष रा. वार्ड न. 34 पोददार बगीचा, वर्धा हा मिळुन आला त्याचे ताब्यातुन 1) एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन टाटा कंपनीची इंडीका विस्टा क्र एम. एच 40 ए.सी. 6153 अंदाजे किंमत 6,00,000/- रू च्या डिक्की मधुन 2) 2 लिटर च्या विदेशी दारूने भरून असलेल्या इम्प्रेरियल ब्लु कंपनिच्या 2 प्लॉस्टीक बंफर 3) 1 लिटर च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 6 प्लॉस्टीक बंफर 4) दोन खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या कॉसबर्ग कंपनिच्या 48 टिन 5) एका खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या बडवाईझर कंपनिच्या 24 टिन कॅन 6) 375 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या 18 शिश्या 7) 375 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 18 शिश्या 8) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 18 शिश्या 9) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 24 शिश्या 10) 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल चॉलेन्जर कंपनिच्या 24 शिश्या 11) एक पांढऱ्या रंगाचा ओप्पो कपंनीचा मोबाईल मध्ये जिओ कपंनीचे सिम क्र 9022120564 कि 10000/- रू चा असा एकुण जु. किंमत 6,95,200/- रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

सदर आरोपीस विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केल्याने सदर विदेशी दारूचा माल हा नागपुर येथे मेयो हॉस्पीटल जवळ जावुन तेथे माझे जवळ असलेल्या मोबाईलने सुनिल बेद रा. नागपुर यास त्याचे मो.क्र वर फोन करून सुनील बैद यास विदेशी दारू व बियर साठी पैशे दिले व त्यांनी माझी गाडी व पैशे घेवुन जावुन काही वेळातच विदेशी दारूचा माल आणुन दिला असे सांगीतल्याने सदर आरोपी नामे सुनील बैद रा. नागपुर यास आरोपी बनविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 443/2024 कलम 65 अई, 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181,130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये